ताज्या घडामोडी

जिल्हयातील सर्व तृतीयपंथी यांचे एकदिवसीय शिबीर

जास्तीत जास्त सहभाग नोंदवून विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा - सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर,  : तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याणसाठी दि. २३ जून रोजी रोजी शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषाभवन येथे सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्त्या तृतीयपंथी गौरी सावंत यांचे मार्गदर्शन तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांचे तृतीयपंथी यांच्याबाबतची कायदेविषयक मार्गदर्शन व तृतीयपंथीयांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयातील तृतीयपंथी व्यक्तींनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ. कोल्हापूर संपर्क क्र०२३१ २६५१३१८ येथे संपर्क साधण्यात यावा

Related Articles

Back to top button
??????