ताज्या घडामोडी

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी जयश्री जाधव यांचा संवाद

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, शाहू दयानंद ग्राऊंड व छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी संवाद साधला.

खेळ, खेळाडूंना आण्णांनी नेहमीच पाठबळ दिले. कोल्हापूरातील क्रीडांगणाचा सर्वांगीण विकास व्हावा, खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत यासाठी आण्णा प्रयत्नशिल होते. मात्र, दुर्देवाने आण्णा आपल्यातून अचानक गेले आणि हे काम अपूर्ण राहिले. आण्णांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे जयश्री जाधव यांनी यावेळी सांगितले.

आण्णा क्रीडा क्षेत्राचे आधारवड होते. सर्वांसोबत आण्णांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आण्णांच्या माघारी जयश्री जाधव यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी नागरिकांनी दिला.

Related Articles

Back to top button
??????