ताज्या घडामोडी

मानगाव म्हणजे जागतिक कीर्तीचे ऐतिहासिक गाव….

मानगाव ; मानगाव म्हणजे जागतिक कीर्तीचे ऐतिहासिक गाव या गावांमध्ये १९२० साली छत्रपती शाहू राजे आणि विश्वरत्न डॉ:बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने उर्जित झालेली भूमी या भूमीत दूरदृष्टी असलेला राजा छत्रपती शाहू यांनी घेतलेली बहिष्कृत परिषद या परिषदेत विश्वरत्न,महामानव, परमपूज्य ,बोधिसत्व ,भारतरत्न, डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शाहू राजे यांनी तुम्ही इथून पुढे दीनदलित बहुजन समाजाचे पुढारी आहात असे घोषित केले आणि या ऐतिहासिक परिषदेनंतर डॉ:बाबासाहेब आंबेडकर हे अखंड विश्वामध्ये नावारूपाला आले आणि अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या शोषित वंचित समाजाला अंधारातून प्रकाशाकडे घेवून गेले याच माणगाव मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखो भीमसैनिक भिमज्योत प्रज्वलित करण्यासाठी आणि ती ऊर्जित झालेली भिमज्योत आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी येतात आज विश्वरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भिमज्योत प्रज्वलित करण्याचा मान आम्हाला मिळाला यानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तसेच केंद्रीय मंत्री ना:डॉ:रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने माणगाव येथील सर्व मंडळांना भेटी दिल्या.

Related Articles

Back to top button
??????