ताज्या घडामोडी

संततधार पावसात शेतकऱ्यांचा आक्रोश

 कोल्हापूर ; प्रोत्साहनपर अनुदानाची केवळ घोषणा नको तर तत्काळ खात्यात पैसे जमा करा, यामागणीसाठी बुधवारी संततधार पावसात शेतकऱ्यांनी आक्रोश केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हय़ातील शेतकरी मोठय़ासंख्येने रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रोत्साहनपर अनुदानासाठी प्रशासनाने घातलेल्या जाचक अटी रद्द करुन नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनापर्यंत अनुदानाचे पैसे द्या, अन्यथा पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला प्रोत्साहनपर अनुदान, ऊसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये द्या, दिवसा वीज पुरवठा, खतांचे वाढलेले दर कमी करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ऐतिहासिक दसरा चौक येथून दुपारी मोर्चाला सुरवात झाली. व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारन प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा अडीच वर्षांपुर्वी केली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतुद केली. 1 जुलैला शेतकरयांच्या खात्यावर पैसे जमा होणार तोच ठाकरे सरकार पडणार हे लक्षात आल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अनुदानापासून शेतकरी वंचित राहतील अशा पद्धतीने जाचक अटी घातल्या. अटींमुळे जिल्हय़ातील 92 टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जाचक अटी रद्द करुन शेतकरयांना तत्काळ 50 हजार रुपये देण्याची मागणी शेट्टी यांनी केली.

Related Articles

Back to top button
??????