ताज्या घडामोडी

सुसंस्कार हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कोल्हापूर: सुसंस्कार शिक्षण मंडळ अंतर्गत सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा कदमवाडी (भोसलेवाडी) यांच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रा.डॉ.शरद गायकवाड यांनी “आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान” याविषयावर मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरफान अन्सारी होते. तर प्रमुख उपस्थितीत सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक एम.एच.मगदूम, भरत लाटकर, हसन देसाई, सुरेश कांबळे, अशोक चौगुले, चंद्रसेन जाधव, शामराम कांबळे, नंदकुमार डोईजड, संतोष पाटील, मुख्याध्यापक विजय भोगम, मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक गुलाब अत्तार यांनी प्रबोधनपर गीते सादर केली यास भगवान कांबळे यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पांडुरंग गवळी, स्वागत बी.एम.जमादार, पाहुणे परिचय अरुण आतवाडकर तर आभार सौ. वहिदा मुल्ला यांनी मानले.

Related Articles

Back to top button
??????