ताज्या घडामोडी

26 व 27 मार्चला दस्त नोंदणीचे कार्यालय सुरू – मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने

कोल्हापूर  : जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये दि. 26 व 27 मार्च रोजी शासकीय सुट्टीतही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.2, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.3, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.4, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, इचलकरंजी क्र.1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, इचलकरंजी क्र.2, दुय्यम निबंधक श्रेणी-1, शिरोळ, दुय्यम निबंधक श्रेणी-1, हातकणंगले या कार्यालयांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button
??????