ताज्या घडामोडी

कातळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता लांबोर

उपसरपंचपदी शब्बीर नाचरे

गगनबावडा / प्रतिनिधी
गगनबावडा तालुक्यातील कातळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुनिता धाकलू लांबोर तर उपसरपंच पदी एक मताने शब्बीर नाचरे यांची निवड करण्यात आली व निवडणूक अधिकारी म्हणून गगनबावडा तालुक्याचे मंडल अधिकारी म्हणून उदय लांबोरे यांनी काम पाहिलेसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची उल्लंघन व गुलालाची उधळण करण्यात आली व ग्रामपंचायत पासून ते गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली कातळी ,लखमापूर ,नर्वेली ,या गावातून मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते उत्तम भाऊ पाटील ,शब्बीर नाचारे, नसीमा तय्यब मुखरी, उज्वला विनायक पाटील, उषा प्रकाश पाटील ,व पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदा पाटील, व ए बी पाटील ,सर ग्रामसेवक उदय पानारी ,त्याचबरोबर गावकामगार पोलीस पाटील असगराली रेठरेकर ,उपस्थित होते ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

Related Articles

Back to top button
??????