ताज्या घडामोडी

आजपासून दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

कोल्हापूर,  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतीगृह, हातकणंगले येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 7 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 9 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतीगृह, हातकणंगले येथे ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर होणार आहे. दि .11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून त्यांच्या कार्यावर आधारित वक्त्यांकडून मार्गदर्शन. 13 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतीगृह, हातकणंगले येथे संविधान जागर व जनजागृती कार्यक्रम. दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. 16 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतीगृह, हातकणंगले तसेच बौध्द वस्ती स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

Related Articles

Back to top button
??????