आपला जिल्हा

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करुया

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापूर : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने आपल्याकडे येणा-या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

पोलिओ निर्मुलनासाठी नियमित लसीकरणांतर्गत सर्व पात्र बालकांचे वेळेत लसीकरण करणे, संशयित पोलिओ रुग्णांचा शोध घेऊन त्याचे निदान करणे व 0 ते 5 वयोगटातील बालकांना अतिरिक्त पोलिओ डोस देणे ही त्रिसुत्री आहे. पर्यटन व जागतिकीकरणामुळे पोलिओ विषाणू पसरण्याची शक्यता असल्यामुळे 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पोलिओचे दोन थेंब महत्त्वाचे आहेत. अगदी बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत मागील तीन मोहिमेतील अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील अंदाजित 3 लाख 7 हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी मिळून 2 हजार 268 लसीकरण   केंद्राची तसेच 654 मोबाईल टीम, 390 ट्रान्झीट टीमची स्थापना करण्यात आलेली आहे.

Related Articles

Back to top button
??????