ताज्या घडामोडी

गुंतवणूकदांचे ४.५ लाख कोटी बुडाले

शेअर बाजार गडगडला : सेन्सेक्स १६२८ अंकानी तर निफ्टी मध्येही ४०० अंकाची घसरण

गेल्या काही दिवसात आकाशझेप घेणाऱ्या शेअर बाजारने आज गुतंवणूकदारांना चांगलाच दणका दिला. सर्वच निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने अंदाजे ४.५ लाख कोटींचे नुकसान झाल्याच अंदाज आहे. गेल्या १६ महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
आजच्या घसरणीतील मुख्य समभाग आहेत ते म्हणजे एचडीएफसी बँकेचे. बँकेच्या एकूण समभागामध्ये ८.५ टक्क्यांची घसरण झाली. बँकेच्या तिमाही निकालानंतर लगेचच समभागांमध्ये प्रचंड घसरण सुरु झाली.
बुधवारी दिवस सुरु झाल्यावर लगेचच घसरण सुरु झाली. बीएसई व एनएसई ने घसरणीचे संकेत दिले होते सुरवातीला यामध्ये १ टक्का घसरण झाली दिवसभरात ती वाढतच गेली. सेन्सेक्स व निफ्टीची आजची नुकसानीची टक्केवारी २.२५ टक्के इतकी आहे. एका दिवसातील हा देशातंर्गत बाजारातील सर्वात मोठी घसरण आहे.
एका दिवसापूर्वीच ७३१२८. ७७ अंकावर गेलेल्या सेन्सेक्सची सुरवात आज ७१९८८.९३ अशा मोठ्या तोट्यानेच झाली. दिवसभरात १६२८. १ इतक्या अंकाची घसरण होऊन ७१५१५. ७६ अंकावर बंद झाला.
निफ्टीही ४५९. २० अंकानी घसरुन २१५७१.९५ इतक्या अंकावर बंद झाला. त्याचबरोब बँक निफटीमध्येही २००० अंकाची घसरण दिसून आली.

Related Articles

Back to top button
??????