ताज्या घडामोडी

कर्मवीर हिरे महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

गारगोटी ; “विद्यार्थी महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असल्याने महाविद्यालयाच्या वाटचाल व विकासामध्ये विद्यार्थी फार मोठी भुमिका बजावतात. कोणत्याही महाविद्यालयाची ओळख हि त्या संस्थेत शिकणाऱ्या व शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर ठरते. याच बाबींचा विचार करून नॅकचे मुल्यांकन होते. नॅकचे उच्च गुणांकन मिळवण्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबबाव्यात. तसेच विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयाच्या प्रत्येक योजना – सुविधा यांचा उपयोग आपल्या विकासासाठी करून घ्यावा ” असे आवाहन भोगावती महाविद्यालय, कुरुकलीच्या नॅक समितीचे समन्वयक डॉ. टी. एम. चौगले यांनी येथे केले.

ते गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत आयोजित ‘नॅक मूल्यांकनात विद्यार्थ्यांची भुमिका’ या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.चौगले म्हणाले, “विविध परीक्षा, स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, संमेलने, परिषदा यामध्ये विद्यार्थी चमकल्यास महाविद्यालयाचे नाव मोठे होते. नॅकच्या सर्वच मुल्यांकन निकषांमध्ये विद्यार्थी महत्वाचा घटक आहे. ज्या महाविद्यालयात विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवले जातात, त्या महाविद्यालयाला नॅकचे चांगले गुणांकन मिळाल्याचे दिसते.”

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपुरचे डॉ.ए.बी.ममलय्या यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. ममलय्या यांनी नॅकचे सात निकष, प्रत्येक निकषांमध्ये विद्यार्थी आधारित गुण, विद्यार्थी तयारी, आवश्यक कागदपत्रे, त्यांची मांडणी, विद्यार्थी अभिप्राय नमुना व तो भरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेस डॉ.सतीश पाटील, डॉ.संताजी खोपडे, डॉ.सागर पोवार आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक अंतर्गत दर्जा हमी कक्षाचे समन्वयक डॉ.सागर व्हनाळकर यांनी केले. स्वागत डॉ.विलास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. तेहरीन देसाई यांनी केले. आभार प्रा.चेतन भगत यांनी मानले

Related Articles

Back to top button
??????