ताज्या घडामोडी

जरांगे यांच्या डोक्यात हवा गेली

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रीया

मुंबई :  मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे व सत्ताधारी भाजप पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रविवारी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिका केली. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहे, आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्यावर टिकेची झोड उठविली आहे. ते म्हणाले जरांगे यांच्या डाक्यात हवा गेली आहे. मोठी गर्दी बघून ते काहीही बरळू लागले आहेत. पंरतू लोकांनीच त्यांना आता डोक्यावरुन खाली उतरवयास सुरवात केली आहे. ते आता आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून राजकारणावर आले आहेत.

पुढे महाजन म्हणाले की जरांगे पाटील यांना आम्ही खूप सहकार्य केले. त्यांचा सन्मान केला, मी सहावेळा त्यांच्याकडे गेलो आहे. मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधिशांना त्यांच्याकडे पाठवले. मुख्यमंत्री स्वत: दोनवेळा त्यांना भेटायला गेले. पण जरांगे हे ऐकायलाच तयार नाहीत, मी म्हणेल तेच करा अन्यथा तुमचा पक्ष संपवून टाकेन अशी वक्तव्य करु लागले आहेत. तर थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे ते आता माफी देण्याच्या पुढे गेले आहेत.

जरांगे यांनी फडणवीसांबाबत केलेले वक्तव्य कोणालाही आवडलेले नाही. मराठा बांधवांनाही त्यांचे बोलने पटलेले नाही. त्यांचे आता अती लाड झाले आहेत. जरांगे यांना आता आपण महाराष्ट्राचा राजा झालो आहोत असे वाटत आहे. असेही महाजन यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
??????