ताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई : कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार अशी बिरुदावले मिरवलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदूजा रुग्णालयात दाखल केले होते, तिथे हृदयविकारचा झटका आल्याचे निदान झाले. अतिदक्षता विभागातत्यांच्यावर उपचार सुरु तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या जोशी संरावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. गेले महिनाभर त्याच्यांवर उपचार सुरु होते. नुकतेच त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यातच काल त्यांना हृदयविकारचा झटका आला. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

Back to top button
??????