ताज्या घडामोडी

अजित पवारांअगोदर जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

जयंत पाटलांच्या सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना अजित पवार यांच्या अगोदर उपमुख्यमंत्रीपदाची भाजपची ऑफर होती. असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी, राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केला. स्वतः फडणवीस यांनी ही ऑफर दिली असल्याचा दावाही त्यांनी केला. दिड वर्षांपूर्वी ही ऑफर जयंत पाटील यांना आली होती. मात्र जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्धार करत फडणवीस यांची ऑफर स्वीकारली नाही. सध्या पाटील यांच्याबाबत अफवा पसरवण्याचा उद्योग सुरु असून त्यावर विश्वास ठेवू नये असेही पी. आर. पाटील यांनी सांगितले. कुरळप जि. सांगली येथे एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सध्या जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीसुद्धा त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्यांने हा दावा केल्याने पाटील व भाजपमध्ये यापूर्वी चर्चा झाल्या असल्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत.

Related Articles

Back to top button
??????