ताज्या घडामोडी

बहिरेवाडी येथे मारामारी; बारा जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : बहिरेवाडी (ता.आजरा) येथे शंकर जयसिंग नाईक, आप्पा अशोक नाईक, मिथुन अशोक नाईक इत्यादी नाईक परिवार हे परस्परांचे नातेवाईक आहेत. शंकर जयसिंग नाईक यांचा भाऊ गोपाळ नाईक सकाळी ट्रॅक्टर घेऊन घरी जात असताना चिंतामणी नाईक यांच्या शेतातून ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून चिडून जाऊन आप्पा नाईक, मिथुन नाईक वगैरे १२ जणांनी लोखंडी रॉड व काठ्यांचा वापर करून शंकर नाईक, जयसिंग नाईक, गोपाळ नाईक, जयश्री नाईक या चौघांना त्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

याबाबतची फिर्याद शंकर जयसिंग नाईक रा. बहिरेवाडी यांनी आजरा पोलिसात दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी आप्पा अशोक नाईक, मिथुन अशोक नाईक, चिंतामणी नाईक, सचिन चिंतामणी नाईक, लक्ष्मी चिंतामणी नाईक, नागव्वा सुरेश नाईक, शालाबाई अशोक नाईक यांच्यासह बारा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे

Related Articles

Back to top button
??????