ताज्या घडामोडी

मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी ३० कोटींचा खर्च

पाच महिन्यात दुसऱ्यांदा नुतनीकरण

मुंबई: राज्य सरकारच्या मंत्र्यासाठी असलेल्या निवासस्थानांसाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ५ महिन्यांपूर्वीच या बंगल्यांचे नुतनीकरण करण्यात आले असताना आता पुन्हा एवढ्या पैशांची उधळपट्टी कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे. या नुतनीकरणामध्ये ६० टक्के काम न करताच परस्पर पैसे उचलल्याचा आरोप होत आहे.

याबाबात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च, त्यांचा मेंटेनन्स करणे ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा खर्च करण्यात येतो त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. असे मत व्यक्त केले तसेच महाविकास आघाडी काळातही अशाच प्रकारे खर्च होत होता हे त्यांनी सांगितले.

मंत्री, त्यांचे बंगले व करण्यात आलेला खर्च

सुधीर मुनगंटीवार : पर्णकुटी : १ कोटी ५० लाख

राधकृष्ण विखे पाटील : रॉयल स्टोन : १ कोटी ५८ लाख

गुलाबराव पाटील : जेतवन : १ कोटी १५ लाख

अतूल सावे : शिवगड : १ कोटी ४ लाख

दिपक केसरकर : रामटेक : ७५ लाख ४२ हजार

विजयकुमार गावीत : चित्रकुट : १ कोटी ५४ लाख

उदय सामंत : मुक्तागिरी : १ कोटी १६ लाख

संदिपान भुमरे : रत्नसिंधू : ३७ लाख २६ हजार

दिलिप वळसे पाटील : सुवर्णगड : ७३ लाख

अब्दुल सत्तार : पन्हाळगड : ५० लाख

चंद्रकांत पाटील : सिंहगड : ५२ लाख ३७ हजार

तानाजी सावंत : लोहगड : ८७ लाख ४६ हजार

राहूल नार्वेकर : शिवगिरी : ४२ लाख

आदिती तटकरे : प्रतापगड : ३५ लाख १९ हजार

अजित पवार : देवगिरी : १९ लाख ८९ हजार

रविंद्र चव्हाण : रायगड : ७५ लाख

Related Articles

Back to top button
??????