ताज्या घडामोडी

शोएब मलिकचे तिसरे लग्न

सानिया मिर्झा बरोबर घटस्फोटाच्या चर्चा : अभिनेत्री सना जावेद बरोबर बांधली लग्नगाठ

कोल्हापूर :
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा व पाकिस्तानी क्रिकेटस्टार शोएब मलिक यांच्यातील लग्नाची जोरदार चर्चा त्याकाळी झाली होती. दोन्ही देशांतील या स्पोर्टस् स्टारमधील लव्हस्टोरीने अनेकांचे लक्ष वेधले होते. आता मात्र या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाला आहे. सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने आता तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सानिया व शोएबच्या लग्नाची केस आता कोर्टात गेली आहे. आता मुलग्याचा ताबा कोणाकडे राहणार याची उत्सुकता लागली आहे. कौटुंबिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी परस्पर संमतीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच घटस्फोटही झाला असल्याचे रिपोर्टनुसार कळते. शोएब मलिकने २०१० साली आपली पहिली पत्नी आयेशा हिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर सानिया मिर्झासोबत त्याचे सुत जुळले होते. २०१८ मध्ये या दोघांना एक मुलगा झाला. इझान असे त्याचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुलगा दुबईत राहणार असून दोघे मिळून त्याचा खर्च उचणार आहेत.
शोवए मलिकचे तिसरे लग्न आहे तर सना जावेदचेही हे दुसरे लग्न आहे. यापुर्वी २०२० मध्ये सनाने गायक उमर जसवाल सोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

Related Articles

Back to top button
??????