ताज्या घडामोडी

ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस मोठ्या उत्साहात साजरा

कोल्हापूर : शांती, समता, बंधुत्व,एकात्मता, आणि सलोख्याचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर (ईद-ए-मिलादुन्नबी) यांच्या जयंती निमित्त जुलूस (रॅली ) काढण्यात आली.

जुलूस (रॅली) हजरतपिर नांगेवली दर्गा कोल्हापूर येथून सुरू झाली. तेथून रॅली मिरजकर तिकटी बिंदू चौक मार्गे हजरतपिर घुडणपिर दर्गा कोल्हापूर येथे आली. तेथून गुजरी मार्गे काझी उस्मान मस्जिद येथे आली. तेथून पुढे हजरतपिर बाबुजमाल दर्गा येथे आली. प्रत्येक ठिकाणी प्रसाद, पाणी, फ्रूट सॅलड, बिस्किटे असा काही ना काही प्रसाद वाटप करण्यात आले. शेवटी नंगेवली दर्गा कोल्हापूर येथे रॅली चा समारोप करण्यात आला. प्रत्येक दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांसाठी व जागतिक शांततेसाठी समता आरोग्य ऐक्य यासाठी प्रार्थना दुआ करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????