ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष संपता संपेना : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रतेची पुन्हा सुणावणी

कोल्हापूर :
शिवसेना फुटीनंतर बराच संत्तासंघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळाला. शिवसेनेच्या आमदार पात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल दिला. यामध्ये त्यांनी शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरविले. त्याचबरोबर शिंदे सरकारही अबाधित राहिले. याच निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुणावनी घेताना सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ३९ आमदारांना नोटीस पाठविली आहे. त्याला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुणावणीमध्ये सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही अशी विचारणा केली. त्यावर ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी यात खूप वेळ जाईल असा युक्तीवाद केला.
आता ३९ आमदारांनी नोटीसीला म्हणने सादर केल्यानंतर दोन आठवड्यानंतर यावर परत सुनावणी होईल. नोटिसीला उत्तर दिल्यानंतरच पुढील सुनवाणी कुठे होणार यासंदर्भात निर्णय होणार आहे.

Related Articles

Back to top button
??????