ताज्या घडामोडी

चिल्लर पार्टी मार्फत ‘थुई थुई आभाळ’ पुस्तकाचे प्रकाशन

 

कोल्हापूर : मोबाईलपेक्षा मैदानी खेळ खेळा, पुस्तकं वाचा असे आवाहन साहित्यिक आणि करवीरचे गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले.लहान मुलांचे भावविश्व असलेल्या ‘थुई थुई आभाळ’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी चिल्लर पार्टी मार्फत करण्यात आले. येथील शाहू स्मारक भवन येथे “निम्स् आयलंड” चित्रपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन आले.विश्र्वास सुतार म्हणाले, मुलांनी मोबाईलच्या जगात जास्त गुरफटून जाऊ नये, मोबाईलपेक्षा फुटबॉलसारखे खेळ खेळावेत, आभासी जगापेक्षा पुस्तकं वाचावित, चांगले सिनेमे पहावेत.

‘थुई थुई आभाळ’ पुस्तका बद्दल बोलताना ते म्हणाले, मुलानं जे वाटते, ते कवीने या पुस्तकात सोप्या भाषेत लिहिले आहे. नवनवीन शोध लावणारे सकस साहित्य यात आहे, असेही विश्वास सुतार यांनी यावेळी सांगितले. यावेळी या पुस्तकाचे कवी आणि टिक्केवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पाटील यांनीही या मुलांशी संवाद साधला. शहरी-ग्रामीण शैलीतील संवाद मुलांना जवळचे वाटतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित लहान मुलांच्या हस्ते विश्वास सुतार यांनी या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. यावेळी चिल्लर पार्टीमार्फत ‘सिनेमा पोरांचा’ हे पुस्तक देऊन प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. शाहू स्मारक भवन येथे आयोजित चित्रपटाची माहिती पद्मश्री दवे यांनी सांगितली तर मिलिंद यादव यांनी प्रास्तविक केले. रवींद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ओंकार कांबळे, घनश्याम शिंदे, चंद्रकांत तुदिगाल, अर्शद महालकरी, बबन बामणे, गुलाबराव देशमुख, शशिकांत कुंभार, सचिन पाटील, विजय शिंदे, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????