ताज्या घडामोडी

सौ.अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत इचलकरंजी मध्ये महिला महोत्सव

इचलकरंजी ; भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सौ.अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत महिला महोत्सव पार पडला. यावेळी त्यांनी मनोगतात महिलांनी स्वावलंबी व्हावे, तसेच स्वत:मधील कलागुणांना वाव द्यावा असे सांगत उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर  यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी भाजप अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख, अनिल जी डाळ्या, आकाश मुल्ला, पूनम जाधव, सुनील महाजन, वैशाली नाईकवाडे, आनंद मस्के, आजम जमादार, शाहरुख गडवाले,शोभा वसवाडे, सुरेखा पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
??????