ताज्या घडामोडी

कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा पोट निवडणूक कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना 12 एप्रिल रोजी सुट्टी

कोल्हापूर, : २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीचे मतदान दि. १२ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या दिवशी २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदारसंघाच्‍या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्‍या त्‍या मतदारसंघाच्‍या बाहेर असतील त्‍यांना देखील लागू राहील. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बॅंका इत्‍यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
??????