ताज्या घडामोडी

रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान

बालिंगा / प्रतिनिधी
युवकांनी गावोगावी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आणि रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे. असे मत अमर पाटील. (शिंगणापूरकर ) यांनी व्यक्त केले. बालिंगा.ता.करवीर. येथील कै. गौरव अशोक जांभळे .यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिराच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, कृष्णात माळी,अजय वाडकर .विकास जांभळे यांच्या उपस्थितीत हे रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात 60 जणांनी रक्तदान केले या कार्यक्रम प्रसंगी शिंगणापूर जिल्हा परिषदेचे भाग्यविधाते मा.अमर उर्फ अमृत पाटील ,सामाजिक कार्यकर्ते कृष्णात माळी,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, सचिन माळी, धनंजय ढेंगे , सामाजिक कार्यकर्ते विकास जांभळे ,जयदीप तिबिले, ओंकार जत्राटे,अजय वाडकर,सौरभ जांभळे, विकास कांबळे,विशाल जांभळे,मुयर सांवत, प्रसाद वाडकर,अनिकेत शिंदे,आदी उपस्थित होते. रक्तदाब संकलनासाठी सी.पी.आर.कोल्हापूर हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
??????