ताज्या घडामोडी

लोकअदालत कोल्हापूर पॅटर्न

कोल्हापूर : मागील तीन राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 195 14 प्रकरणे निकाली न्यायव्यवस्थेवरील तानामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्यायमिळण्यास विलंब होत आहे .या परिस्थितीत प्रलंबित आणि दाखल पूर्व दावे निकाल काढण्यासाठी आयोजित लोकअदालतमध्ये तडजोडीने दावे निकाली काढण्यात कोल्हापूरने बाजी मारली आहे . गेल्या तीन लोकअदालतमध्ये कोल्हापूरने दाखलपूर्व 15889 व प्रलंबीत 3625 आशी एकूण 19 514 प्रकरणे निकाली काढून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात वेगळाच कोल्हापूर पॅटर्न निर्माण केला आहे . तसेच या लोक अदालतीत एकूण 7189 64 8 3 4 यवढ्या रकमेची वसुली देखील झाली आहे .
एकेकाळी गावात भांडणे झाली की गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येऊन वाद मिटवायची .सध्याचे लोकअदालत म्हणजेच सध्याचे आधुनिक स्वरूप आहे .विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील तरतुदी अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे व तालुका विधी सेवा समिती द्वारे लोक न्यायालयाचे आयोजन करून जलद न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.

दोन्ही पक्षकार खुश
लोकअदालतमध्ये तडजोड झाल्यास दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते .निकाल झाल्यास एक बाजू नाराज होण्याची शक्यता असते , लोकअदालतमध्ये प्रकरण मिटल्यास दोघीही आनंदी असतात त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होतो .कोल्हापूरने तीन लोकअदालतीमध्ये जास्त दावे निकाली काढून एक वेगळी ओळख निर्माण केली असून पुढील राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिनांक 13 – 8 – 2022रोजी केली असून यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे .सदरचे लोक आदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश * श्री *एस .सी . चांडक सो यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये औद्योगिक ,सहकार , कौटुंबिक न्यायालय आणि कामगार न्यायालय तसेच शाळा न्यायाधिकरण येथे अभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे पक्षकार अधिवक्ता तसेच नागरिकांनी लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन विधी सेवा सचिव मा. श्री प्रितम पाटील यांनी केले आहे .
तीन लोक अदालतीचा अढावा
11 डिसेंबर 20 21 रोजी झालेल्या लोकअदालत 13 O77 निकाली निघाली यामध्ये 1 O85 प्रलंबित तर 11 992 दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे .
12 मार्च 2022 रोजीझालेल्या लोक अदालती मध्ये एकूण 4476 प्रकरणे निकाली निघाली यामध्ये प्रलंबित 1471 तर दाखलपूर्व 3005 प्रकरणांचा समावेश आहे.
7 मे 2022 रोजी झालेल्या लोकअदालतीमध्ये एकूण 19 51 प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये दाखलपूर्व प्रकरणे 892 व 1059 प्रकणांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button
??????