ताज्या घडामोडी

सत्ताधारी पक्षांतील नेत्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान ?

अशोक चव्हाणांच्या कारखान्याला १५० कोटींची थकहमी

मुंबई : राज्यात सत्ताधारी पक्षांसोबत असलेल्या अनेक नेत्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी १४७. ७९ कोटी रुपयांची देण्यात आली आहे. याचबरोबर अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांच्या कारखान्यांनाही राज्य बँकेने मदत केली आहे. त्याचबरोबर एनसीडीसी (नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन ) या केंद्रीय संस्थेने विजयसिंह मोहिते- पाटील, हर्षवर्धन पाटील, अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे, धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांना मदत केली आहे. त्यामुळे सध्या सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत मिळाली आहे.

Related Articles

Back to top button
??????