ताज्या घडामोडी

जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महारॅली

कोल्हापूर ; आज महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले स्वाभिमानी कोल्हापूरकर जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आज या महारॅलीला उसळलेल्या प्रचंड जनसमुदायाकडे पाहून एवढेच वाटते की, हा हजारोंचा जनसमुदाय म्हणजे जयश्रीताईंच्या विजयाची साक्ष आहे. जयश्रीताईंचा विजय निश्चित आहे.

शेवटच्या टप्प्यात आलेल्या या निवडणुकीत आपण सर्वांनी अधिक जागरूक राहत जयश्रीताईंच्या विजयाचा मार्ग सुखकर करूया!

आता आण्णांच्या माघारी असणारी आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी कोल्हापूरच्या विकासाचे आण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिल्या क्रमांकाचे हात या चिन्हासमोरचे बटन दाबून आपण जयश्री ताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्याल हा विश्वास असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले.

Related Articles

Back to top button
??????