ताज्या घडामोडी

‘आजरा साखर’ तर्फे ऊस उत्पादकता वाढ मेळावा

आजरा : आजरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आज रोजी एकरी २० ते २२ मे.टन उसाचे उत्पादन होते. या उत्पादनात वाढ होण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांची मात्रा योग्य प्रमाणात देण्याबरोबरच पाण्याचेही नियोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी केले.

गवसे येथे आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित एकरी ऊस उत्पादकता वाढ मेळाव्यात ते बोलत होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले यांनी केले. यावेळी अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक अंजना रेडेकर, दिगंबर देसाई, राजेंद्र सावंत, दशरथ अमृते, सेक्रेटरी व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेजर वसंत गुजर, चीफ अकौंटंट प्रकाश चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
??????