ताज्या घडामोडी

घाडगे-पाटील कामगार ते सरपंच डॉ.जितेंद्र यशवंत.संस्मरणीय प्रवास…!

कोल्हापूर ; कोणाचे आयुष्य कधी कोठे आणि कसे बदलले हे सांगता येत नाही,पण आपला मार्ग प्रामाणिक विश्वासाचा व जिद्दीचा असलेस कोणतेही यश आपण नक्कीच मिळवू शकतो,हे सिद्ध करून दाखवले गडमुडशिंगी येथील घाडगे-पाटील कामगार ते सरपंच डॉ. जितेंद्र तानाजी यशवंत यांनी त्यांना नुकतेच साउथ इंडियन मधील इंडियन युनिव्हर्सिटी कडून बिझनेस आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट ही पदवी मिळली आहे. अत्यंत कमी वयात मानाची डॉक्टरेट मिळवून डॉ.जितेंद्र यशवंत यांनी आपल्या कार्याची समाजापुढे आदर्श ठेवला आहे.मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले जितेंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज,ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या विचारांचा वसा अंगी वारसा घेऊन व आपले वडील एसबीआय मधून निवृत्त व कामगार संघटनेचे नेते तानाजी यशवंत व आई नंदा यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शक असून त्यांचा खडतर प्रवास सुखकर होत गेला.घाडगे-पाटील कंपनीमध्ये ते काही वर्षे काम करत होते.पण सामाजिक कार्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यातूनच त्यांनी गडमुडशिंगी-हुपरी रो हाऊसेस बांधायचे ठरविले,व सर्व धारकांना स्वस्तात पण दिमाखदार बंगले बांधून देण्याचे ते काम करू लागले.व काही वर्षातच त्यांनी या बांधकाम व्यवसाय मध्ये आपले नाव प्रस्थापित केले.यातूनच ते समाजकार्यासाठी तन-मन-धनाने मदत करू लागले. त्यातूनच पहिल्यांदा समाजकार्याच्या जोरावरती ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली जिंकली व सरपंच होऊन त्यांनी काही वेळात आदर्श यशवंत सरपंच घेण्याचा मान मिळविला. त्याचबरोबर महापूर व कोरोणा काळात केलेल्या सेवा ही त्यांना डॉक्टरेट पर्यंत घेऊन गेली.हा प्रवास जरा सोपा वाटत असला,तरी खडतर होता. त्यांना अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कोरोणा युद्धा,व युवा उद्योजक,समाज भूषण,आदर्श सरपंच यशवंत असे अनेक पुरस्कार त्यांना हे त्यांच्या समाज कार्यातून मिळाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.त्यातूनच कोल्हापूर पासून साउथ इंडिया पर्यंत डॉक्टरेट मिळवून देऊन गेला ज्या समाजात आपण जन्मलो त्यांचे आपण काही तरी देणं लागतो. या समस्येतून कार्य करीत असलेले जितेंद्र हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. व नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात. अशा या युवा नेतृत्व डॉक्टरेट मिळाले बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व गौरव होत आहे. या गडमुडशिंगी गावची नोंद साऊथ इंडिया मध्ये घेतली गेली.

Related Articles

Back to top button
??????