ताज्या घडामोडी

शनिवार, रविवार शासकीय सुट्टीदिवशी जिल्हा निबंधक कार्यालय सुरु

कोल्हापूर : अभय योजनेअंतर्गत थकीत मुद्रांक शुल्कच्या दंडात असलेल्या सूटचा लाभ नागरिकांना होण्यासाठी शनिवार 30 जुलै व रविवार 31 जुलै या दोन्ही दिवशी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.

अभय योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये दि. 1 एप्रिल ते 31 जुलै 2022 या कालावधीकरिता दंड सवलत 90 टक्के (दंड रकमेच्या) व दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीकरिता दंड सवलत 50 टक्के (दंड रकमेच्या) इतकी सवलत देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
??????