ताज्या घडामोडी

महाविकास आघाडीला यादव गवळी समाज सर्व संघटनेचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : कोल्हापुरात महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शाखा कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा गवळी समाज महासंघ, युवा संघटना, हिरकणी ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून गवळी समाज कोल्हापूर शहरातील संघटीत असून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना सर्व संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी ऍड. सुतार म्हणाल्या आण्णाचे अधूरे स्वप्नं पुर्ण करण्यासाठी गवळी  समाजाने पाठिंबा दिल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले. कोल्हापुरातील पहिली महिला आमदार होण्याचा मान जयश्री ताईंना देवूया. तसेच आण्णांचे अधूरे राहीलेले स्वप्नं पूर्ण करण्यासाठी संधी द्यावी.
सत्यजित जाधव म्हणाले, वाढती बेरोजगारी पाहता कोल्हापुरात उदयोग निर्माण करुन रोजगार वाढविण्याचे काम करणार आहे.

युवराज गवळी म्हणाले, गवळी समाजाला महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळीनी वेळोवेळी  मदत केले आहे. आताही सर्व गवळी समाज महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतो.
यावेळी ट्रस्टचे विश्वस युवराज गवळी, केडीसीच्या संचालिका स्मिता गवळी, कार्याध्यक्ष उदय डाकवे, दिलीप गवळी,दत्ताजीराव वाझे, चंद्रकांत चिले, शंकरराव महाडिक, बाजीराव गावकर, वैभव चिले, राहुल चिले, पुष्पक चिले, सुशांत गवळी, गिता डाकवे, स्वाती चौगले, प्रिवण भालेकर, अभिजीत चिले, संतोष पांचाळ, हेमंत चिले, रोहिणी गवळी, रुपा डाकवे अरुणा डाकवे आदी सह गवळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आभार संतोष पांचाळी यांनी मानले.

 

Related Articles

Back to top button
??????