ताज्या घडामोडी

ग्रामीण भागात जत्रा यात्रांचा हंगाम सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे निर्बंध उठले आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या जत्रा – यात्रांचा ग्रामीण भागातील हंगाम सुरू झाला आहे. ग्रामदैवतांच्या यात्रेच्या निमित्ताने चाकरमान्यांसह पै पाव्हण्यांचा राबता वाढला आहे. या यात्रामध्ये गुलाब, खोबरे, आईस्क्रिम, मिठाईसह खेळण्यांपासून गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, विविध खेळ, पाळणे आदींमधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने फिरत्या व्यावसायिकांना अच्छे दिन येऊ लागले आहेत.

मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे गर्दी होणाऱ्या सण समारंभावर शासनाने निर्बंध घातले. ‘देवा’ सह देऊळही बंद झाले होते. यामुळे गावोगावच्या यात्रा-जत्रा निर्बंधाच्या जोखडात अडकल्या होत्या. सर्वजण संसर्गाच्या भीतीच्या छायेखाली वावरत होते. त्यामुळे सण-समारंभासह ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रा देखील साध्या पद्धतीने साजऱ्या होत होत्या. यात्रेला येणारे पाहुणेही यात्रेला फिरकत नव्हते. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटले आहेत. त्यामुळे शाहूवाडीतील ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम बहरू लागला आहे. कुस्त्यांचे फड: ग्रामीण भागातील यात्रा तमाशा व कुस्त्यांशिवाय पूर्णच होत नाही. कोरोना निर्बंध उठल्याने जंगी कुस्त्यांचे फड़ भरू लागल्याने त्यांनाही अच्छे दिन आले आहेत

Related Articles

Back to top button
??????