ताज्या घडामोडी

मराठी चित्रपट संमेलन कोल्हापूरात संयोजन समितीच्या अध्यक्षपदी अनिल म्हमाने यांची निवड

कोल्हापूर  : अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने दि. 27 आणि 28 एप्रिल, 2022 रोजी केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दोन दिवसीय पहिले मराठी चित्रपट संमेलन आयोजित केले आहे.
या संमेलनास महाराष्ट्रासह देशभरातून अनेक दिग्गज कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते आणि राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाच्या सविस्तर नियोजनाची व्यापक बैठक आदित्य सभागृह, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या नियोजनाच्या व्यापक बैठकीत संमेलनाची स्थानिक संयोजन समिती तयार करण्यात आली असून संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हमाने यांची तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत प्रा. किसनराव कुराडे यांनी एकमताने निवड करण्यात आली. इतर स्थानिक संयोजक समिती पुढील प्रमाणे डॉ. सतीशकुमार पाटील, भरत लाटकर, भालचंद्र कुलकर्णी, विश्वास सुतार, ॲड. विवेक घाटगे, बबनराव रानगे, एम. बी. शेख, श्रीकांत गावकर, प्रा. शोभा चाळके – उपाध्यक्ष, चंद्रकांत सावंत – खजिनदार, प्रा. वसंत भागवत व ॲड. करुणा मिणचेकर – सचिव, नूरजान शेख व डॉ. दयानंद ठाणेकर – सहसचिव, डॉ. अमोल कोठाडिया, डॉ. स्मिता गिरी, एम. डी. देसाई, हसन देसाई, अनिल मोरे, ॲड.अधिक चाळके – सदस्य, मारुती गायकवाड व डॉ. कपिल राजहंस – सहकार्याध्यक्ष तर व्यवस्थापकीय सचिव – चंदनील सावंत, सिद्धार्थ कांबळे, ऋतुराज पाटील यांची निवड करण्यात आली.
सदर बैठकीस अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे मनिष व्हटकर, महेश्वर तेटांबे, उमेश जाधव, अभिजित भारणे, वैभव काळे यांच्यासह निर्मिती फिल्म क्लबचे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे पहिले मराठी चित्रपट संमेलन कोल्हापूरकरांना साजेल अशा पध्दतीने यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Related Articles

Back to top button
??????