ताज्या घडामोडी

संत बाळूमामा यात्रेची भंडाराच्या उधळणीत सांगता

श्रीक्षेत्र आदमापूर (ता .भुदरगड) येथील सद्गुरू बाळुमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या मिरवणुकीत पाच क्विंटल भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. पारंपारिक वाद्यांचा गजर या पालखी सोहळ्यामध्ये करण्यात आला. श्रींच्या मंदिरावर केलेली फुलांनी केलेली सजावट व मंदिर परिसरात  रेखाटलेल्या बाळूमामांच्या रांगोळी या वैशिष्ट्यपूर्ण होत्या .

22 मार्चपासून सुरू असलेला भंडारा यात्रेची सांगता झाली. यात्रा काळात हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासन यंत्रणा अतिशय दक्ष होती. कोरोनाचे निर्बंध उठल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन बाळूमामा देवालय समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ व बाळू मामांचा भक्तगण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन यात्रेसाठी केले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान व अन्य राज्यातील भाविक येतात. यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळुमामाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज, फटाक्यांची आतषबाजी, हालगी घुमक्याचा ताल, लेझीम, बँड अशी पारंपारिक वाद्य वापरत, डॉल्बीला फाटा देत पालखी मिरवणूक संपन्न झाली.

Related Articles

Back to top button
??????