ताज्या घडामोडी

केळी क्लस्टरअंतर्गत केळी निर्यातीस चालना…

कोल्हापूर : कृषि निर्यात धोरणअतंर्गत अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषिविभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज हुपरे मल्टिपर्पज हॉल, कुंभोज, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे निर्यातक्षम केळी उत्पादन व निर्यातवृध्दी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन उपविभागीय कृषि अधिकारी मकरंद कुलकर्णी, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेस माजी जिल्हा परिषद अरुण पाटील, सदस्य श्रीकांत माळी, किरण माळी, कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्ठशास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जयवंत जगताप, सहयोगी प्राध्यापक डॉ. विष्णु गरांडे, सुरेशमगदुम, उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, व्यवस्थापक जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

मकरंद कुलकर्णी यांनी जिल्ह्यात केळी हे पिक उसाला पर्याय म्हणुन पुढे येत असल्याचे नमुद करुन केळी क्लस्टर अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या पुढे येण्याचे गरज असल्याचे सांगीतले व कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच केळी उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान याबाबत डॉ.जयवंत जगताप यांनी मार्गदर्शन केले.

केळी पिकातील सुगी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया या संदर्भात डॉ.विष्णु गरांडे, केळी पिकाची निगा व काढणी याबाबत सुरेश मगदुम, पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत डॉ.सुभाष घुले व केळी पिकाची पणन व्यवस्था याबाबत जितेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले

Related Articles

Back to top button
??????