ताज्या घडामोडी

तडाका तालीम, छावा मित्र मंडळ, देवगिरी फायटर्स, शाहू फौंडेशन, खा.एस.डी. पाटील ट्रस्ट पुढल्या फेरीत…

राष्ट्रीय हॉकी खेळाडू कै अनिल सावंत (बंड्या) स्मृतीचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा...

कोल्हापूर  :- येथील लाईन बझार हॉकी मैदानावर पदमा पथकाच्या वतीने राष्ट्रीय हॉकी खेळाडू कै.अनिल सावंत (बंड्या) स्मृतीचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस आज झालेल्या सामन्यांमध्ये तडाका तालीम, छावा मित्र मंडळ, देवगिरी फायटर्स, शाहू फौंडेशन, खा.एस.डी. पाटील ट्रस्ट यांनी पुढील फेरीत प्रवेश केला.

आजच्या सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात तडाका तालीम संघाने हनुमान ब्लेसिंग संघाचा स्ट्रोकवर २-१ गोलनी पराभव केला.
सामन्याच्या पूर्वार्धात ३ ऱ्या मिनीटास तडाका च्या राजवर्धन तोडकर याने गोल करत संघास एक गोलची आघाडी करून दिली. मात्र २१ व्या मिनीटास हनुमान ब्लेसिंग च्या मजहर शेख ने मैदानी गोल करत सामना १-१ बरोबरीत आणला. उत्तरार्धात दोन्ही संघाकडून गोल करता आला नाही सामन्याची वेळ संपल्याने हा सामना तडाका तालीम संघाने स्ट्रोकवर २-१ गोलनी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या सामन्यात छावा मित्र मंडळाने पोलीस बॉइज संघाचा ४-० गोलनी पराभव केला. छावाकडून माज सय्यद, सुहेल शेख, पार्थ पाटील व माधव तोरसकर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तिसऱ्या सामन्यात देवगिरी फायटर्स (वडगाव) संघाने दिग्विजय नाईक फौंडेशन (इचलकरंजी) संघाचा ६-० गोलनी पराभव केला. देवगिरीकडून रोहन पवार याने ४ गोल तर विवेक दुर्गुळे व प्रदीप पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करत संघास विजय मिळवून दिला. दिग्विजय नाईक संघाचा खेळाडू प्रथमेश गायकवाड ने उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात शाहू फौंडेशन संघाने डी.सी.सी.अकॅडमी (सांगली) संघाचा ८-० गोलनी एकतर्फी पराभव केला. शाहूकडून पारस पाटील ने ३, विनायक हांडे ने २ तर यशवर्धन गुरव, विनायक माने, अनिकेत चौगले यांनी प्रत्येकी एक गोल करत संघास विजय मिळवून दिला.

पाचव्या आणि आजच्या शेवटच्या सामन्यात खा. एस.डी. पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) संघाने बुध्दीहाळकर ट्रस्ट संघाचा ६-० गोलनी पराभव केला. एस.डी. पाटील कडून साईशाम जाधव, पंकज पाटील, प्रथमेश पाटील, ऋषी ऊरुणकर, रोहन पाटील व वैभव खांबे यांनी प्रत्येकी १-१ केले. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून बुध्दीहाळकर संघाचा प्रमोद पाटील याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

उद्या दि.२५/०३/२०२२ रोजीचे सामने

१. पदमा पथक वि.शिवतेज तरुण मंडळ (सकाळी ०८:०० वा.)

२. निशिकांत दादा पाटील स्पोर्ट्स फौंडेशन (इस्लामपूर) वि.छावा मित्र मंडळ (सकाळी १०:०० वा.)

३. वासू स्पोर्ट्स (हुबळी) वि. तडाका तालीम (दुपारी ०३:०० वा.)

४. फलटण हॉकी असो. (फलटण) वि. खा.एस.डी. पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) (दुपारी ०४:०० वा.)

स्पर्धेत पंच सागर जाधव, मुकुंद रजपूत, धिरज पाटील, संदीप सावंत, विनोद ढोले, संदीप जाधव, योगेश देशपांडे, अभिजित पाटील, निसार म्हालदार, सुमित सौंदलकर, संजय डोंगरे, दत्ता पाटील हे काम पाहत आहेत.

वरील हॉकीची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करणेस विनंती.

स्पर्धा समिती
कै.अनिल सावंत (बंड्या) स्मृतीचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा

Related Articles

Back to top button
??????