ताज्या घडामोडी

कृषि विभागाच्यावतीने तांदूळ, गूळ, धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर : कृषि विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 अंतर्गत तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व लोकांना पटवून देऊन त्याची मागणी निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून या पिकांखालील क्षेत्रात वृध्दी करण्यास शेतक-यांना प्रोत्साहित करणे या हेतूने प्रचार व प्रसिध्दीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. मार्गदर्शनपर कार्यशाळा व तांदूळ, गुळ, धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे 26 ते 28 मार्च 2022 रोजी तांदूळ, गूळ, धान्य महोत्सवाचे आयोजन केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता श्री.जोतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे, निगवे दुमाला येथे आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी / माता पालक यांच्या मदतीने ग्रामीण भागामध्ये 500 विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरी होणार आहे.

दिनांक 26 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्धोग अंतर्गत खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

27 मार्च रोजी पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन. यामध्ये तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व लोकांना पटवून देण्यासाठी कृषि विभागाबरोबरच आत्मा विभागाच्या समन्वयाने कृषी विद्यापीठे, आहारतज्ञ, प्रगतीशील शेतकरी, उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समावेशाने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये तृणधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असून तृणधान्य पिकांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावून त्याव्दारे माहिती देण्यात येईल.

Related Articles

Back to top button
??????