ताज्या घडामोडी

येत्या पावसाळ्यात नागणवाडी धरणात पाणीसाठा करण्याचा संकल्प पूर्ण करणार

आमदार प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन-पांगिरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 

पिंपळगाव /वार्ताहर

नागणवाडी धरणाच्या उर्वरित पुनर्वसनाचे काम पूर्ण करून धरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहेे. धरणाच्या घळभरणीचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या पावसाळ्यात धरणात पाणीसाठा करण्याचा आपला संकल्प आहे. धरणाच्या पाणी पूजनावेळी चिकोत्रा खोऱ्यातील शेतकरी जनता सुद्धा गावागावात गुढी  उभी करून आनंद व्यक्त करतील त्याच वेळी मला खरा आनंद मिळेल. हा नागणवाडी खोरा सुजलाम-सुफलाम करणे हेच आपले स्वप्न आहे,असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेे. ते पांगिरे (ता. भुदरगड) येथील विविध विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी  बोलत होतेे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम भराडे हे होते.

यावेळी पंचवीस -पंधरा हेड अंतर्गत पांगिरे ते नागणवाडी रस्ता १० लाख रुपये, तलाठी कार्यालय इमारत बांधण्यासाठी १७ लाख ६५ हजार रुपये, शाळा दुरुस्तीसाठी दोन लाख रुपयेे, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा स्कीमसाठी ६४ लाख रुपये, पांगिरे ते गारगोटी चिकोत्रा नदीवरील पूल ३ कोटी रुपये ,१५ वा वित्त आयोग पंचायत समिती फंडातून रस्ता डांबरीकरण ५ लाख रुपये असा भरपूर निधी देऊन या सर्व कामाचे उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.          यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले,या नागणवाडी प्रकल्पालचे काम गेली वीस वर्षापासून पुनर्वसानामुळे रखडलेले होते. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका बाजूला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणे व प्रकल्पाचे काम सुरू करणे याच उद्देशाने केलेल्या कामामुळे आज खऱ्या अर्थाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. याच वर्षी प्रकल्पाची घळ भरणी करून पाणी आडवणार असून प्रकल्पाच्या पाण्यामुळे या परिसरातील सर्वच शेती ओलीताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे खडकमाळ म्हणून ज्या परिसराची ओळख होती तो सर्व परिसर ओलीताखाली आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. या प्रकल्पामुळे , नागणवाडी, दिंडेवाडी, पाल, भेंडवडे, हेळेवाडी, मानवळे, मुरूक्टेसह लाभक्षेत्राशेजारी गावांनी पाणीपरवाने घेऊन फायदा करून घ्यावा.

यावेळी जि .प. सदस्या रोहिणी आबिटकर ,पंचायत समिती माजी सभापती स्नेहल परीट, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक दत्ताजीराव उगले,गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे ,सरपंच सर्जेराव पाटील, माजी सरपंच राजाराम भराडे , श्रीधर भोईटे, बारवेचे आनंदराव पाटील, योगेश पाटील, दिगंबर देसाई, किरण गुरव,  विद्याधर परीट, ज्ञानदेव जाधव ,मारुती भराडे ,नामदेव गडकरी,तानाजी घोटणे, निलेश भराडे, गणपती भाटले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत मारुती भराडे ,प्रास्ताविक निवृत्ती भाटले यांनी तर आभार हिंदुराव मातले यांनी मानले.

 

Related Articles

Back to top button
??????