ताज्या घडामोडी

जय सियाराम !

रामलल्लांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विधिवत प्राणप्रतिष्ठा : ५०० वर्षांनंतर अयोध्येत राम विराजमान

कोल्हापूर :
न भूतो न भविष्यत: असा क्षण आज संर्पण देशाने अनुभवला. अखंड भारताचे स्वप्न आज पूर्ण झाले. नयनरम्य, भक्तीरसाने न्हालेला सोहळा आज अयोध्येत रंगला होता. ५०० वर्षाचा संघर्ष, न्यायालयीन वाद, अनेक आंदोलने झाल्यानंतर अनेक भारतवासियांचे स्वप्न आज सत्यात उतरले. अयोध्या येथे सकाळी १२.२९ या शुभमुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य अशा श्रिराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.
या सोहळ्यावेळी अयोध्यानगरी सजली होती, हेलिकॉप्टरमधून भव्य मंदिरावर पुषवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे याप्रसंगी गाभाऱ्यात उपस्थित होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून भाविक, राजकीय नेते, कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती आदी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितामध्ये सुपरस्टार रजनिकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कटरिना कैफ, विकी कौशल, कंगना राणावत या दिग्गजांचा समावेश होता.

.

Related Articles

Back to top button
??????