ताज्या घडामोडी

प्रत्येक गावात ग्राहक संरक्षण समिती स्थापन करा : सुरेश माने

जेऊर येथे जागतिक ग्राहकदिन उत्साहात साजरा

पन्हाळा / प्रतिनिधी
ग्राहक पंचायत सदैव ग्राहकांना मार्गदर्शन, जागृती व प्रबोधन करीत असून ग्राहकांच्या हक्कासाठी गाव पातळीवर ग्राहक संरक्षण समित्या स्थापन करा,असे आवाहन ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक सुरेश माने यांनी केले.
जागतिक ग्राहकदिन सप्ताहानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र व तहसील कार्यालय पन्हाळा, पुरवठा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जेऊर (ता. पन्हाळा) येथे ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर होते.


कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद व बिंदुमाधव जोशी (नाना) यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दिप प्रज्वलन करून झाली.
यावेळी बोलताना सुरेश माने यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रची ओळख व कार्याची माहिती दिली तसेच धनाजी गुरव यांनी ग्राहक कायदा व जागतिक ग्राहक दिन कसा व कोणामुळे सुरू झाला यासंदर्भात मार्गदर्शन केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा संघटीका प्रमोदिनी माने यांनी महिलांची लक्षणीय उपस्थितीत पाहून महिलांनी सोने, राशन, कापड-वस्तू खरेदी करतेवेळी होत असलेल्या फसवणुकी बद्दल कसे जागृत रहावे याबद्दल माहिती दिली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांनी मायक्रो फायनान्स मधून होत असलेली लुबाडणूक तसेच ग्राहकांची बाजारपेठेत होत असलेल्या फसवणुकीबद्दल कशी सतर्कता बाळगायची याबद्दल बचत गट महिलांना माहिती दिली. तसेच ग्रामस्थांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आणि इथून पुढे ग्राहक पंचायत महाराष्ट्र सदैव ग्राहकांना मार्गदर्शन, जागृती व प्रबोधन करीत राहील अशी ग्वाही दिली.
वैधमापन शास्त्रचे निरीक्षक सावंत यांनी वजन व इलेक्ट्रॉनिक काटे मध्ये बाजारपेठेत ग्राहकांना कसे फसवले जाते याची उदाहरणे दिली व अशा काही तक्रारी असतील तर विभाग कार्यालय, जिल्हा कार्यालयात संपर्क साधा असे आवाहन केले. तसेच तालुका सदस्य दिलीप पाटील यांनी गाव पातळीवर ग्राहक संरक्षण समिती स्थापन करावी अशी संकल्पना मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी सभापती अनिल कंदुरकर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करताना ग्रामस्थांनी वस्तू खरेदी करतेवेळी काळजी घ्यावी असे आवाहन करून गाव पातळीवर ग्राहक संरक्षण समिती स्थापन करणेबाबत नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब तांदळे यांनी केले.
या कार्यक्रमास तालुका पुरवठा अधिकारी मुकुंद लिंगम, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पुणे विभाग सदस्य सुशांत पाटील, तालुका अध्यक्ष बाजीराव कदम, तालुका संघटक अजित शेलार, तालुका सदस्य अशोक गराडे, विष्णू पाटील, धनाजी निगडे, भास्कर लोखंडे, नवनाथ कुंभार, अमोल पाटील, रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष आनंदा लादे, जेऊर सरपंच संजीवनी दाभोळकर, उपसरपंच विक्रम पाटील, मा.उपसरपंच धोंडीराम पाटील,ग्रामपंचायत सदस्य निरंजन सरवदे यांच्यासह तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????