आपला जिल्हा

करवीर तालुक्यातील दक्षिण मतदार संघातील के .डी .सी. सी .बँक लि. ठेव वाढ संदर्भ कर्मचारी मेळावा संपन्न

कोल्हापूर ; नामदार सतेजउर्फ बंटी पाटील व बँकेचे चेअरमन हसन सो. मुश्रीफ  तसेच आमदार ऋतुराज पाटील यांच्या सूचनेनुसार सौ. स्मिता युवराज गवळी संचालिका .के. डी. सी .सी. बँक ली. यांच्या अध्यक्षतेखाली व बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. ए बी. माने  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठेव वाढ मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 करवीर तालुक्यातील सर्व शाखांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी सौ. स्मिता गवळी व श्री युवराज गवळी यांनी कर्मचाऱ्यांना ठेव वाडी संदर्भात व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांना मानसन्मान देणे संदर्भात अनेक अनमोल सूचना केल्या .शिवाय बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून बँकेला देशात एक नंबरचे स्थान मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले बँकेच्या वेगवेगळ्या सेवा सुविधा देणे, ज्यादा शेअर्स घेणे, एस .एम .एस. नोंदणी मोबाईल ॲप, मायक्रो एटीएम सुविधा ,नवीन ग्राहक शोधणे, व ग्राहकांना उत्तम सेवा सुविधा देणे संदर्भात मार्गदर्शन केले…..

यावेळी बँकेच्या नूतन संचालिका. सौ काटकर वहिनी तसेच श्री शाहू काटकर साहेब उपस्थित होते .तसेच बँकेचे अधिकारी श्री जगताप  विभागीय अधिकारी यादव , कुंभार  व सर्व शाखाधिकारी सर्व निरीक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर मेळाव्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

Related Articles

Back to top button
??????