ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा जिल्हास्तरीय स्नेहमेळावा 27 मार्चला कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार.

कोल्हापूर ; महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ( डि.एन.ई.136) जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दि. 27 मार्च रोजी सहकुटुंब स्नेहमेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये शालेय विद्यार्थी यांनी सन 2018 — 2019 ते 2021– 2022 या शैक्षणिक वर्षांत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तसेच कला क्रिडा क्षेत्रात व स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या मुला मुलींचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ तसेच जिल्हा परिषद मधून सेवानिवृत्त झालेल्या, वर्ग 1 व वर्ग 2 या स्तरावर पदोन्नती मिळालेल्या, गुणवंत पाल्य, सभासद यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार. सरचिटणीस के. टी.सीताप .मानद अध्यक्ष गौतम कांबळे. कार्याध्यक्ष आर. डी.कुंभार . यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या स्नेहमेळाव्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण. हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते जिल्हा परिषदेचे मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख. आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.) मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं.) अरुण जाधव, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन.ई.136 अध्यक्ष एकनाथराव ढाकणे,विभागीय अध्यक्ष सात्तापा आण्णाप्पा कांबळे. आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरचा स्नेहमेळावा गारगोटी रोड कळबा तलावासमोर जय पॅलेस कळबा. ता.करवीर येथे होणार आहे. सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ग्रामसेवक बांधवांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यास हजर रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार. यांनी केले आहे

Related Articles

Back to top button
??????