ताज्या घडामोडी

अठराव्या बालनाट्य स्पर्धेचा शुभारंभ

कोल्हापूर .-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आज अठराव्या बालनाट्य स्पर्धेचा शुभारंभ झाला. या स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी बाचणी या प्रशलेने मुख्याध्यापक  अनिल पाटील लिखित बालवीर ही नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशासाठी प्राणार्पण केलेल्या बाल क्रांतिवीरांच्या शौर्याला या नाटिकेचे माध्यमातून उजाळा देण्यात आला. 1942 च्या लढ्यात संपूर्ण भारत मोर्चे आंदोलने करत रस्त्यावर आला होता. यात प्रौढ स्त्री-पुरुषांच्या बरोबर विद्यार्थीही सहभागी झाले होते. नंदुरबार मधील शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन नंदुरबार मधील पोलीस ठाण्यावर तीन मोर्चा नेला. आणि पोलिस ठाण्यावर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या वर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. यामध्ये शिरीष सह त्याचे पाच मित्र धारातीर्थी पडले. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात 13- 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण दिल्याची ही  दुर्मिळ घटना नाट्यरूपात सादर करून विद्यार्थ्यांच्या शौर्य शाली इतिहासाला उजाळा देण्यात आला.

पृथ्वीराज पाटील, अनुष्का मगदूम, पृथ्वी पाटील, रुद्राक्ष पाडळे, अनिकेत चौगुले, मयूर रानगे, प्रतीक कोळी, अर्णव पाटील, समर्थ साखरे, विराज पाटील, वर्धन मगदूम, वर्धन पवार, गणेश पाटील या विद्यार्थ्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. तर इतर 30 हून अधिक विद्यार्थी या नाट्य मध्ये सहभागी झाले.

संस्थापक निवास पाटील, संस्था अध्यक्ष राजेंद्र पाटील, संस्था कार्यवाह विलास पाटील यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले.

 

Related Articles

Back to top button
??????