ताज्या घडामोडी

कोल्हापुरात गोवा बनावटीचा २६ लाखांचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर  : कोल्हापूर विभागीय राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने शहरालगत असणाऱ्या मोरेवाडी येथे छापा टाकून गोवा बनावटीच्या मद्याचा साठा करणाऱ्या सदद्दामहुसेन मुल्ला या तरुणाला ताब्यात घेतले आहे.मुल्ला याच्याकडून सुमारे २६ लाखांच्या मद्यासह एकूण 30 लाख 67 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रंगपंचमी आणि होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या या कारवाईने मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आणि बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आदेश दिले होते . त्यानुसार विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे आणि उपअधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या मोरेवाडी येथे मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मोरेवाडी इथं गोवा बनावटीच्या मध्याचा बेकायदेशीरित्या साठा केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने मोरेवाडी येथील समता कॉलनीतील एका घरावर छापा टाकला असता या ठिकाणी एका खोलीत आणि इमारती शेजारी लावलेल्या एका ट्रक मध्ये गोवा बनावटीच्या मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. यावेळी हा साठा करणाऱ्या सद्दामहुसेन मुल्ला याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख २६ ९२० रुपयांच्या मद्यासह मद्याच्या वाहतुकीसाठी असणारा ट्रक असा एकूण 30 लाख 67 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईमध्ये निरीक्षक संभाजी बरगे, सहायक निरीक्षण जगन्नाथ पाटील,अंकुश माने, मिलिंद गरुड,गिरीश करचे, विजय नाईक,नारायण रोटे,सचिन काळेल ,बबन पाटील यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Back to top button
??????