ताज्या घडामोडी

कोल्हापूरात ईद फेस्टिवलचे आयोजन

कोल्हापूर :  कोल्हापूर दि. 22.4.2022 मुस्लिम बाधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त विंदुचौक येथील पार्कींग जागेमध्ये गुरूवार दि . 28 .4 .2022 ई रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांचे हस्ते ईद फेस्टिवलचे उदघाट्न होणार आहे . मा. महापौर निलोफर आश्किन आजरेकर, पक्षप्रमुख शारंगधर देशमुख, माजी महापौर हसिना फरास, आदिल फरास स्थायी समिती सभापती  सचिन पाटील , कॉग्रेस अध्यक्ष श्री सचिन चव्हाण, माजी महापौरआर.के. पवार, उपमहापौर संजय मोहीते, शिवसेनेच्या पुजा भोर, ईश्वर परमार ,. विनायक फाळके , हरिदास सोनवणे, जितू सलगर इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. संस्थापक गणी आजरेकर यांनी ईद फेस्टिवलची प्रथा काही वर्षापूर्वी सूरू केली. परंतू 2 वर्षे कोविडमुळे ईद फेस्टिवलचे आयोजन करणेत आले नव्हते. सालाबादप्रमाणे यावर्षी रमजानईद निमित्त्त ईद फेस्टिवल होणार आहे . ईद फेस्टिवलच्या ठीकाणी सुकामेवा. मसालेशेवया. साखर कांदे, लसूण. सह अनेक अत्यावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर मिळतात . सर्व हिंदु मुस्लिम बांधवांनी या ईद फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष शौकत बागवान, (तडाका) सदस्य शकील अत्तार, हमीद बागवान ,मलिक बागवान ,सईद तांवोळी , मुस्ताक ताशिलदार, निलेश भोसले जमील बागवान राजू अत्तार राजू सुभेदार ,राजू यादव , समीर बागवान ,के जी यांनी केले .

Related Articles

Back to top button
??????