ताज्या घडामोडी

कॉर्बेवॅक्स लस १२ ते १४ वयोगटातील मुलांना द्या

मोदी सरकारचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

केंद्र सरकारने देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. उद्या, बुधवारपासून या मुलांचे लसीकरण सुरू केले जाईल. परंतु, या वयोगटातील मुलांना केवळ ‘कॉर्बेवॅक्स’ लस लावावी, असे निर्देश मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुले तसेच १८ वर्षांहून अधिक वय असलेल्यांसाठी यापूर्वीच लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील बालकांना कॉर्बेवॅक्स लस (Vaccine) लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. १४ ते १५ वयोगटातील मुलांना १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात यापूर्वीच समाविष्ठ करण्यात आले आहे. या मुलांना भारत बायोटेकने विकसित केलेली पूर्णत: स्वदेशी लस ‘कोव्हॅक्सिन’ दिली जात आहे.

Related Articles

Back to top button
??????