ताज्या घडामोडी

आदरणीय बाबासो खोत (आण्णा) साहेब यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त भव्य कीर्तन सोहळ

कोल्हापूर :  सांगवडेवाडी गावाचे आदरणीय बाबासो खोत (आण्णा) साहेब यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कीर्तन सोहळा पार पडला  यावेळी, प्रसिद्ध कीर्तनकार मा. श्री. निवृत्ती महाराज (इंदोरीकर) यांचे कीर्तनाचे आयोजन केले होते.

आदरणीय खोत आण्णा यांचा हा जीवन प्रवास म्हणजे समाजकारण, राजकारण आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कामाचा चालता बोलता इतिहासच आहे. वयाच्या 21 व्या वर्षी सांगवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लोकसंपर्काच्या जोरावर ते तिन वेळा ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. सांगवडेवाडीतील सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून 10 वर्षे त्यांनी यशस्वीपणे काम केले. पंचगंगा पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन म्हणून काम करताना गावापर्यंत पाण्याची स्किम आणली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. शेतीमध्ये अनेक प्रयोग करत असताना त्यांनी आपले वेगळेपण जपलेच त्याच बरोबर अनेक सामाजिक उपक्रमातही ते आघाडीवर राहीले. कोरोनाच्या काळातही त्यांनी अनेक गरजूंना धान्य वाटप केले.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या आण्णांनी समाजातील प्रत्येक घटकाशी आपले नाते निर्माण केलेल आहे. त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या पत्नीने दिलेली साथही तितकीच मोलाची आहे. आण्णांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र सुदर्शन खोत हे चांगल्या पध्दतीने पुढे नेत आहेत. आदरणीय आण्णांना दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!

 

Related Articles

Back to top button
??????