ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी आव्हानांना सामोरे जाऊन यश संपादन करावे : शिल्पा ठोकडे

कागल : सुरेश डोणेविद्यार्थ्यांनी आव्हानांना सामोरे जाऊन यश संपादन करावे तर महिलांनी सक्षमपणे जबाबदारी पेलणे गरजेचे आहे.10 वी नंतर विद्यार्थ्यांचे बंदिस्त जग संपले असून उद्याच्या या स्पर्धात्मक आणि बेभरवशाच्या काळात तुम्ही प्रवेश करणार आहात यामुळे प्रलोभने व आमिषापासून दूर राहून करिअरवर लक्ष करण्याचे आवाहन कागल च्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले. त्या श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हनूर (ता.कागल) येथील एस.एस.सी विद्यार्थी शुभेच्छा समारंभ व महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्षा सुनंदा निकम होत्या.

शिल्पा ठोकडे यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक विविध प्रसंग सांगून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या उत्कर्षासाठी स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे व आपल्या आईवडिलांचे,कुटुंबाचे हित साधून समाजाप्रती कृतज्ञता ठेवावी. यावेळी दौलतराव निकम विद्यालयाच्या अनेक उपक्रमांचे कौतुक करून जिल्ह्यातील एक आदर्श शाळा असल्याचे म्हटले.
यावेळी महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांच्या भित्तीपत्रिकेचे उदघाटन करण्यात आले.सिद्धनेर्ली ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता पोवार, बहुजन पतसंस्थेचे नूतन संचालक नंदकुमार कांबळे,व प्रशालेस दिलेल्या देणगीबद्दल देणगीदारांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव यशवंतराव निकम,आप्पासाहेब खापणे,श्रीपती संकपाळ,नागनाथ विद्यालय एकोंडीचे मुख्याध्यापक एस.टी.चौगुले,प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, पोलीस पाटील अश्विनी माने,माता पालक संघाच्या अध्यक्षा संध्या कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले. दहावीच्या उपक्रमांचा आढावा वर्गशिक्षक सावंत जे.एन यांनी दिला,सूत्रसंचालन आर. व्ही. इंगवले यांनी केले तर आभार एन.सी.यादव यांनी मानले.

Related Articles

Back to top button
??????