ताज्या घडामोडी

राज्याचे राजकारण बदलणाऱ्या शरद पवारांच्या त्या सभेची कोल्हापुरात पुनरावृत्ती!

सतेज पाटील अन्‌ अमित देशमुख यांनी कोल्हापुरात पावसात घेतली प्रचार सभा

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सातारा येथे २०१९ मध्ये भरपावसात झालेली सभा आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणाचा बदलेला लंबक आजही जनतेच्या पक्के लक्षात आहे. त्यांच्या त्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णायक जागा जिंकत राज्याच्या सत्तेत भागीदारी मिळविली. कोल्हापूरमध्ये आज त्याची पुनरावृत्ती झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सभेत धो धो पाऊस आला आणि सतेज पाटलांसह सर्वच राजकीय नेते आणि एकाही नागरिकाने जागा न सोडता सभा पूर्ण केली. या पावसातील सभेची सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ टाकाळा येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भरपावसात सभा झाली. नेतेमंडळींसह एकाही नागरिकाने यावेळी सभास्थळ सोडले नव्हते, हे विशेष. व्यासपीठावरील नेते तसेच उपस्थित नागरिक भिजत पावसात उभे होते. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषणे ऐकली. त्यामुळे शरद पवार यांच्या सातारा येथील सभेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

या सभेत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, सीपीआरचा विस्तार करण्याबरोबरच चित्रनगरीत अत्याधुनिक सुविधा देऊन हजारो नागरिकांच्या हाताला काम देऊन कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. त्यामुळे उत्तरच्या पोटनिवडणुकीत आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरील रेष आहे. भाजपच्या कुटील राजकारणाला तसेच अफवा, भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहनही केले.

महाआघाडी सोडताना राजू शेट्टींचा जयंतराव, अजित पवारांवर गंभीर आरोप
‘‘मनाचा मोठेपणा दाखवून निवडणूक बिनविरोध करायला हवी होती पण ते न करता भाजपकडून राजकारण केले जात आहे. काश्‍मीर फाईल्सपेक्षा कोल्हापूर फाईल्स महत्त्वाच्‍या आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा विचार पुढे नेण्यासाठी आघाडीच्या पाठीशी राहावे. कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवायचे आहे. सीपीआर विस्तारीकरणाच्या आराखड्याला मंजुरी देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देणार आहोत,’’ असे देशमुख म्हणाले.

 

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळवून देण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक अनिल कदम यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भारती पोवार, विनायक सूर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस, विशाल देवकुळे, प्रकाश चौगले, सोनाली माने आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????