ताज्या घडामोडी

बकरी ईद 10 जुलैला चाँद कमिटीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर, : मुस्लिम धर्मीय बांधवांची ईदूल अजहा म्हणजे बकरी ईद रविवारी दि.10 जुलै रोजी होणार असल्याची चाँद (हिलाल) कमिटीतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या दिवशी सकाळी साडे आठ वाजता मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर बकरी ईदची नमाज होणार आहे.

मुस्लिम बोर्डिंग मध्ये मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सायंकाळी मगरीब नमाज नंतर ही बैठक झाली. यावेळी मुंबई, दिल्ली, कर्नाटक,इंडी, बिहार, उत्तर प्रदेश, पटना, फुलवारी शरीफ अशा शहरांशी संपर्क साधून चंद्र दर्शनाची साक्ष घेण्यात आली.

बैठकीस हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी, मौलाना इरफान कासमी, मुबीन बागवान,मौ. नाझीम पठाण, मौ. अब्दुलवाहिद सिद्दिकी, मौ.अबुतालिब सिद्दिकी,मौ.रफिक सनदी आदी उपस्थित होते. अशी माहिती मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
??????