ताज्या घडामोडी

गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.. नविद मुश्रीफ

90 लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व उध्दघाटन सोहळा संपन्न

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरताली ९० लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व उध्दघाटन तसेच प्रभाग तीन ३ मधील बांधकाम कामगार व कुंभार समाजाला सुरक्षा संच तसेच विद्यार्थींना शैक्षणिक सहाय्य आनुदानाचे वाटप गोकूळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मा.नामदार मुश्रीफ साहेबांनी तब्बल तीस कोटीचा निधी गडहिंग्लज शहरासाठी दिला यातील आज माझा हस्ते 90 लाख रुपयांच्या विकास कांमाचा लोकार्पण व उध्दघाटन संपन्न झाले.गडहिंग्लज शहरात विकास कामांचा झपाटा पाहता व लोकांमध्ये झालेले परिवर्तन पाहता गडहिंलज नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता द्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.
संजय गाधी,श्रावण बाळ योजना,बाधकाम कामगार योजना व वैयक्तिक शासकिय योजना, गोरगरीब लोकांची आॕपरेशन ही कामे फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेब व मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्तेच करु शकतात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिल आहे.
यावेळी हारुण सय्यद,राजू जमादार,साविञी पाटील,शिवराज पाटील, दिलीप उपराटे, चंद्रकांत मेवेकरी, उज्वला कुंभार, महादेव कुंभार, यशवंत कुंभार ,रावसहेब कुंभार, मिलिद रिंगणे, बापू उपराटे, आजित नंदिकर, इरफान नाईकवाडे, ताहिर कोचरगी, कबीर मुल्ला, आकरम जमादार, आयुब सय्यद, विश्वनाथ मगदुम, राम पाटील व सर्व राष्ट्रवादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गुंड्या पाटील यांनी स्वागत केले व रेश्मा कांबळे,सिध्दार्थ बन्ने,राम पाटील,सतीश पाटील यांची मनोगते झाली आभार अविनाश ताशिलदारा यांनी केले व सुञ संचालक सुरेश दास व रफिक पटेल यांनी केले.

Related Articles

Back to top button
??????